पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन, कोरोनाविरुद्धची लढाई मोठी, ‘ना थकना है ना हारना, बस जीतना है!’

0
402

 

दिल्ली, दि.६ (पीसीबी) – देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारच्या वर गेली आहे. कोरोनाचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिनी आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संपूर्ण मानवजातीवर महासंकट आहे. कोरोनाविरुद्धचा लढा नक्कीच सोपा नाही. ही लढाई मोठी आहे आणि काळजी घेतली नाही तर जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही लढाई लढताना सतर्क राहाणे आणि संयम राखणे आवश्यक आहे. समोर मोठी आव्हानं आहेत त्यांचा सामना कऱण्यासाठी आणि देशसेवेसाठी कटिबद्धत असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना ५ आग्रह केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना काय म्हणाले…

1.आपल्या परिसरातील एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या. त्यांना मदत करण्यासाठी जाताना मास्क घालून आणि स्वत:ची घेऊन मदत करा.

2.आपल्या कुटुंबियांना आणि ओळखीच्या 5 व्यक्तींना मस्क गिफ्ट करा आणि तो कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी वापरण्याचा सल्ला द्या.

3.कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रस्थानी असणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांचे आभार व्यक्त करा.

4.कमीत कमी ४० लोकांना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगा.

5. सर्व भाजप कर्यकर्त्यांना पीएम-केअर्स या मोहीमेत सहभागी व्हायचे आहे. आपल्यासोबत ४० जणांनाही त्यात समाविष्ट करून घ्यायचे आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, WHO नेही भारताचं कौतुक केले आहे, त्याशिवाय अनेक मंचांमध्ये कोरोनाच्या मुद्दय़ावर भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही बर्‍याच देशांच्या प्रमुखांशी बोललो आहे, आपला देश एक विकसनशील देश आहे जो गरिबीविरूद्ध लढा देत आहे. परंतु या महासंकटाच्या दरम्यान आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहोत.

या महासंकटाचा सामना करण्यासाठी आपल्यात एकजूट असणे फार महत्त्वाचे आहे. १३० कोटी लोकांना लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूचे पालन केलं आहे. रविवारी लोकांनी दिवा लावून एकात्मतेचा संदेश आपण दिला. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईचा संकल्प बळकट झाला आहे.