Maharashtra

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये रंगत; भाजप आघाडीवर

By PCB Author

May 02, 2021

पंढरपूर, दि.०२ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी निकाल लागत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंढरपुरात पुढचा राजा कोण याकडे सगळ्याचे लक्ष आहे. तरी आटा आलेल्या आकडेवारीनुसार सध्या तरी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे अजूनही आघाडीवरती आहेत.

भाजपचे उमेदवार – समाधान आवताडे – 52450 राष्ट्रवादीचे उमेदवार – भगीरथ भालके – 51384