पंडित शिवकुमार शर्मा यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली …

0
428

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार पंडीत शिवकुमार शर्मा यांची प्राणज्योत मालवली. पंडित शिवकुमार शर्मा यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांनी संतूर या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय केले. जीवनभर कलेची सेवा करणाऱ्या या महान कलाकाराला, संगीतकाराला सन २०१२ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ११ वा “आशा भोसले पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला. हे आमचे थोर भाग्य ! त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.