Pimpri

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन; सिमाताई सावळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण

By PCB Author

September 25, 2020

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सिमाताई सावळे आणि बांधकाम व असंघटीत कामगार संघाचे अध्यक्ष सारंग कामतेकर यांच्या हस्ते अभिवादन कऱण्यात आले. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते मुख्य इमारतीत पंडित दिनदयाळ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी नेते नामदेव ढाके सहआयुक्त अण्णा बाधडे उपस्थित होते.