पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू

0
690

गुरुदासपूर, दि. ४ (पीसीबी) – पंजाबमधील गुरुदासपूर येथे फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तर मृतांचा आकडा अजून वाढू शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हा कारखाना रहिवाशी वस्तीत आहे अशी माहिती पोलीस अधिकारी एसपीएस परमार यांनी दिली आहे. बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत.