पंकजा मुंडे भरसभेत चक्कर येऊन कोसळल्या

0
508

बीड, दि. १९ (पीसीबी) – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाषण झाल्यानंतर चक्कर आली. त्यानंतर त्या व्यासपीठावर कोसळल्या.  नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सांगितले जात आहे.

परळीत आज (शनिवार) सायंकाळी सभा आयोजित केली होती. यावेळी पंकजा यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना भोवळ आली आणि त्या व्यासपीठावरच कोसळल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी पंकजा यांचे  पती अमित पालवेही  उपस्थित होते.  गेल्या आठ दिवसांपासून  पंकजा  यांच्या राज्यभर सभा असल्याने  त्यांची मोठी दगदग झाली.  आज  त्यांना परळीत  भावनिक भाषण करताना गहिवरून आले होते, त्यानंतर त्यांना चक्कर आली.

या सभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही  उपस्थित होते.  याबाबत जानकर म्हणाले की, आज सकाळपासून मी पंकजाताईंसोबत आहे. पंकजाताई गेल्या काही दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत.  त्यांना पुरेशी झोप मिळालेली नाही.  सततचा प्रवास आणि जागरणामुळे त्यांना अॅसिडिटीचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना चक्कर आली. पंकजाताईंची तब्येत आता बरी आहे.