Maharashtra

पंकजा मुंडेंचे परळीत हजारो बॅनर झळकले,पण त्यावर ना भाजपचा उल्लेख ना कमळाचा…..

By PCB Author

December 11, 2019

बीड,दि.११(पीसीबी) –स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.यानिमित्ताने भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते हजर राहणार आहेत. 

उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या भूमिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.