न्यायालयाने फडणवीस यांना शेवटची संधी देत २० फेब्रुवारीला सुनावणी

0
393

मुंबई, दि.११ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविली होती. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात केला.

त्यानंतर फडणवीस यांना न्यायालयात अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंती अॅड. उदय डबले यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती मान्य करीत पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सध्या मुंबईमध्ये होणाऱ्या व्यवसाय समितीच्या बैठकीत व्यस्त असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळीही फडणवीस यांनी अनुपस्थित राहण्याबाबत मुभा देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने फडणवीस यांना शेवटची संधी देत या प्रकरणावर २० फेब्रुवारीला सुनावणी ठेवली.

सतीश उके यांनी अर्जाद्वारे केलेली विनंती सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने मान्य न केल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ‘२०१४ सालची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपविली. देवेंद्र फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, असा अर्ज अॅड. उकेंनी दाखल कला होता.

त्यानुसार, न्यायालयाने फडणवीस यांना समन्स बजावत न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते. अॅड. सतीश उके यांच्यातर्फे त्यांनी स्वत: बाजू मांडली. तर फडणवीस यांच्यातर्फे अॅड. उदय डबले यांनी बाजू मांडली.