न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही – संजय राऊत

0
739

मुंबई, दि.१ (पीसीबी) –राम मंदिर निर्मितीवरुन सध्या देशात राजकीय वादळ उठले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली असून न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही, असे  वक्तव्य त्यांनी केले आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी आता केंद्र सरकारनेच भूमिका घ्यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांकडून होत आहे. केंद्र सरकारने मंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी संसदेत खासगी विधेयक आणणार असल्याचे सांगितले आहे. सिन्हा यांनी राम मंदिराबाबत विरोधी पक्षांनाही त्यांच्या भूमिकेविषयी विचारले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते खासगी विधेयक आणण्याची शक्यता आहे.