“न्यायाची थट्टा चालवली आहे; तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत”

0
288

मुंबई,दि.०८(पीसीबी) – न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, अशी खंत अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीला आज अमली पदार्थविरोधी विभागानं अटक केली. अमली पदार्थांच्या तस्करांची तस्करी व खरेदी प्रकरणात नाव आल्यानंतर रियाची चौकशी सुरू करण्यात आली होती. रियाला अटक झाल्यानंतर तिच्या तीन केंद्रीय वकिलांनी खंत व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

“न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली,” अशी खंत सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान प्रेम करणे गुन्हा असेल, तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती स्वतः अटक करून घेण्यासही तयार आहे, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.