Maharashtra

न्यायदान वेगवान होण्यासाठी ब्रिटीशकालीन कायद्यात बदल करणे आवश्यक

By PCB Author

February 17, 2020

नाशिक, दि.१७ (पीसीबी) – नाशिक येथील न्या. कै. एच. आर. खन्ना सभागृहात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे आयोजित वकील परिषद २०२० अंतर्गत जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेनेया विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले , न्यायदान वेगवान व्हावे ही सामान्य जनतेच्या मनातील भावना आहे. त्यादृष्टीने कोणत्या कायद्यात सुधारणा आवश्यक आहेत , याबाबत लोकशाहीच्या चारही स्तंभांनी एकत्रीतपणे विचार करण्याची गरज आहे. न्यायव्यवस्थेने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्यास चांगले बदल शक्य आहेत.

स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटीशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.