Desh

नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीच्या स्फोटात मेजर शहीद; जवान जखमी

By PCB Author

February 16, 2019

श्रीनगर, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला असतानाच नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट होऊन एक मेजर शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. 

नियंत्रण रेषेवर तपासणी सुरु असताना हा स्फोट झाला. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवला होता. आयईडी नियंत्रण रेषेपासून १.५ किमी अंतरावर पेरण्यात आले होते. तो निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर पदावरील अधिकारी शहीद झाला.

दरम्यान, जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात घडवून आणलेल्या   भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.