नोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर

0
1394

नाशिक, दि. २९ (पीसीबी) – संसदेने नोटाबंदी करण्याचा अधिकार रिझर्व  बँकेला दिलेला आहे. पंतप्रधानांना दिलेला नाही. तसेच प्रत्येक नोटेवर जेव्हा नोट सादर केली जाईल,  तेव्हा तिची किंमत परत देण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व बँकेचा अधिकार वापरुन जुमला केला आहे. त्यामुळे नोटा जपून ठेवा. आम्ही त्या परत बदलून देऊ, असे आवाहन भारीप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (रविवार) येथे केले.

बहुजन आघाडीचा मेळाव्यात आंबेडकर बोलत होते. केंद्रातील सरकार जुमलेबाज सरकार असून  ही जुमलेबाजी जास्त काळ राहणार नाही. १५ ऑगस्टनंतर सत्ताधाऱ्यांना उघडे करण्यासाठी  आम्ही कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी वंचित, ओबीसी, बहुजनांना पून्हा क्रांती करावी लागणार आहे.  त्यासाठी आगामी निवडणुकीत ही  संधी वाया घालवू नका, असे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनातील मनुवाद काढून टाकावा. आगामी निवडणुकीत आपण सर्वजण एकसमान आहोत. याच विचाराने प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे.  उमेदवार कोण? त्याच्या जातीचे मतदार किती, अशा चर्चा न करता, आम्ही विषमता मानीत नाही, विषमता मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या विचाराने कामाला लागा,  अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.