Desh

नोटाबंदी फसल्याने मोदींना फासावर लटकावा – काँग्रेस आमदार  

By PCB Author

April 20, 2019

रायपूर, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागला आहे, तशी आरोपप्रत्यारोपाची राळ उठवली जात आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू आहे. नोटाबंदी फसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फासावर लटकावले पाहिजे, असे विधान छत्तीसगडचे आमदार आणि रायगड लोकसभेचे उमेदवार लालजीत राठिया यांनी केले आहे.

राठिया  म्हणाले की,  नोटबंदी आणि काळा पैसा आणण्यात मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत. स्वतः पंतप्रधानांनी म्हटले होत की, शंभर दिवसात काळा पैसा आला नाही, तर मला फासावर लटकवा. आता काळा पैसा परत आलेला नाही. त्यामुळे मोदींना फासावर लटकावले पाहिजे, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावर उत्तर देताना भाजपने त्यांच्या ट्विटरवरून म्हटले आहे की, त्यांना नरेंद्र मोदींना फासावर लटकावण्यासाठी त्यांना मते हवी आहेत. साध्वीला २४ दिवस उपाशी ठेवणे, उमा भारतींना जलसमाधी देण्यासाठी काँग्रेसला मते हवी आहेत, यांचा अहंकार पाहा, अशी टीका भाजपने केली आहे.