नोकरीचे आमिष दाखवून चिंचवडमधील तरुणाला ६३ हजारांचा गंडा

545

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – शाईन डॉट कॉम मधून बोलत असल्याचे सांगून दोघा जणांनी मिळून एकाला टाटा मोटर्स या कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजीनियर या पदावर काम देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी एकूण ६२ हजार ७२८ रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.८) दरम्यान घडली.

यश विकास वारके (वय ५५, रा. फ्लॅट नं.२, साईप्लाझा अर्पाटमेंट, संतमुनीबाबा आश्रमजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संजय सिंग नावाच्या इसमासह एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश वारके हे घरी असताना संजय सिंग नावाच्या इसमाने आणि एका अज्ञात महिलेने वेळोवेळी ९५८७०६९६१८८, ७६३१४६०४९ आणि ९२०५५१८७४२ या मोबाईल क्रमांकावरुन वारंवार फोन करुन शाईन डॉट कॉम मधून बोलत असल्याचे सांगून वारके यांना टाटा मोटर्स या कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजीनियर या पदावर काम देण्याचे आमिष दाखवले. तसेच रजीस्ट्रेशन चार्जेसच्या नावाखाली वेळोवेळी एकूण ६२ हजार ७२८ रुपयांचा गंडा घातला. वारके यांनी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत.