नॉलेज सिटीमधील कुसुमाग्रजनगरी साहित्य संमेलनावर कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे सावट; नागरिकांमध्ये भीती कायम

0
247

नाशिक, दि. ३० (पीसीबी) – नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीमधील कुसुमाग्रजनगरी साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. संमेलन अवघ्या दोन दिवसांवर आले असताना जगभरात धास्ती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे साहित्य संमेलनावरही सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असणाऱ्यांनाच संमेलनात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच आज संमेलनाच्या आयोजन आणि निर्बंधाबाबत पुन्हा एकदा काथ्याकूट होणार आहे.

नाशिकच्या साहित्य संमलेनाचे वेध राज्यभरातील रसिकांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लागले होते. त्यांनी संमेलनाला येण्याची तयारी केली होती. मात्र, कोरोनाच्या ओमिक्रॉनने ते सुद्धा संभ्रमात आहेत. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडळपाची क्षमात 14 हजार आहे. मात्र, आयोजकांनी ती आता सुरक्षित अंतर पालनासह 7 हजारांवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. सोबतच संमेलनात लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. किमान लसीचा पहिला डोस घेतलेला असावा. अन्यथा संमेलन स्थळीच डोस दिला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाची बैठक
साहित संमेलन आणि आढळलेला नवा ओमिक्रॉन विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सकाळी तातडीचे बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय, पोलीस, आरोग्य, सुरक्षा, महापालिका अधिकारी यांच्यासोबत संमेलन नियोजन समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कडक निर्बंध घालण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय इतर महत्त्वाचे निर्णयही होऊ शकतात.