Pimpri

नॉन कोविड रुग्णांसाठी आरोग्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करा- नगरसेविका, आशा शेंडगे

By PCB Author

May 12, 2021

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) -कोविड 19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत गेली तशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनेक रुग्णालये हे पूर्ण कोविड रुग्णालये करण्यात आली आहेत .. यामुळे शहरातील नॉन कोव्हीड रुग्ण जे आहेत त्यांची देखील गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय .. ज्यांना अर्धांग वायू ,लिव्हरशी संबंधित आजार , किडनीशी संबंधित आजार , हृदयाशी संबंधित आजार तसेच फॅक्चर इत्यादी आजार असतील आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असेल, ज्या रुग्णांचे हातावरचे पोट असेल अशा लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.. . आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही.त्यामुळे नॉन कोविड रुग्णांसाठी आरोग्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावी अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केलीय .

गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी करण्याचा निर्णय घेतला आणि सगळी व्यवस्था उभी केली होती. मागील लाटेमधे नॉन कोविड रुग्णांसाठी जशी व्यवस्था करण्यात आली होती अशी व्यवस्था या लाटेमध्ये देखील करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे ..