Pimpri

नेहरुनगर येथील गॅस एजन्सी धारकाला धमकावून मागीतली ५० हजारांची खंडणी

By PCB Author

April 16, 2019

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक रस्त्यावर लावत असल्याने एका एजन्सी धारकाला ५० हजारांची खंडणी आणि १० हजारांचा हप्ता मागीतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरीतील नेहरुनगरमधील आण्णासाहेब मगर स्टेडीयमजवळ घडली.

याप्रकरणी अमोल भागवत विधाते (वय ३६ रा.मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सरदार रविंदर सिंग (वय ४८, रा.दोपाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल यांची गॅस एजन्सी आहे. ते आण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळील रस्त्यावर गॅस सिलेंडरने भरलेले ट्रक उभे करतात. या कारणावरुन सरदार सिंग यांनी रस्त्यावर गाड्या लावत असल्याचा जाब विचारला. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी ५० हजार आणि दरमहा १० हजारांचा हप्ता द्या अशी मागणी केली. आणि हप्ता न दिल्यास एजन्सीवर कारवाई करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरदार सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.