नेहरुनगरमध्ये फुटपाथवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात सिमेंट गट्टु मारुन अज्ञाताने केले जखमी

0
970

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – नेहरुनगर येथील गांधीनगरकडून येणाऱ्या रस्त्याच्या फुटपाथवर बसलेलेल्या एका तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने सिमेंटच्या गट्टूचा तुकडा मारुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि.१८) रात्री पावनेअकराच्या सुमारास घडली.

अनिकेत अनिल सर्जे (वय २२, रा. रामचंद्र संकुल, सेवा विकास बँकेजवळ, नेहरुनगर, पिंपरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावनेअकराच्या सुमारास अनिकेत हे  नेहरुनगर येथील गांधीनगरकडून येणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर बसले होते. यावेळी मागून एका अनोळखी इसमाने त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूचा तुकडा मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. ते तातडीने जखमी अवस्थेत संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी गेले. मात्र या दरम्यान त्यांच्या खीशातील ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ होऊन नुकसान झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.