नेहरुनगरमध्ये दुचाकीवरुन घरी निघालेल्या कामगाराचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

0
565

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – काम आटपून आपल्या दुचाकीवरुन घरी निघालेल्या एका कामगाराला मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास नेहरुनगर येथील जनता बँके समोर घडली.
दत्ताराम आयरे (वय ५१, रा. कुलदीप आंगण सोसायटी, नेहरुनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम आयरे हे भोसरी एमआयडीसी येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते काम आटपून एका ओळखीच्या माणसाला घेऊन आपल्या दुचाकीवरुन नेहरुनगर येथील त्यांच्या घराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी नेहरुनगर येथील जनता बँकेच्या समोर आली असता मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये आयरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.