नेहरुंचे भाषण मला खूप आवडते – नितीन गडकरी   

0
804

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते  व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे भाषण मला खूप आवडते  असे सांगून त्यांचे विचारांचे जाहीररित्या कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यावेळी गडकरी म्हणाले की, जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचे हे भाषण मला खूपच आवडते. त्यामुळे मी इतके जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही. नेहरुंनी म्हटले होते की, भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू, तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंच भाषण आपल्याला फार आवडतं असे गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरी पुढे म्हणाले की आपण विद्वान असून शकता, मात्र हे जरुरी नाही की लोकांनी तुम्हाला मते दिली पाहिजेत. ज्यांना वाटते की त्यांना सर्व काही समजते. त्यांचा हा समज चुकीचा आहे. आत्मविश्वास आणि अहंकार यांमध्ये अंतर आहे. आपल्याला आत्मविश्वासू असायला हवे, पण अहंकारापासूनही दूर राहायला हवे, असे ते म्हणाले.