नेरे मारंजीतील संत तुकाराम कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जर्नादन पायगुडे यांची निवड  

0
459

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – नेरे मारंजी येथील संत तुकाराम विविध  कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जर्नादन पायगुडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस नरूटे यांनी काम पाहिले. चेअरमनपदासाठी पायगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पायगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

निवडीप्रसंगी सोसायटीचे व्हाईस चेअरमन हिरामण जाधव, सदस्य दत्तात्रय गाढवे, छाया शिंदे, जालिंदर जाधव, प्रकाश बुचडे, राजू कदम  आदीसह बबनराव पायगुडे, बाळासाहेब पायगुडे, संपत (नाना) जाधव, लक्ष्मण शिंदे, दिलीप जाधव, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.