Chinchwad

नेरेदत्तावाडीत दुकानाचे शटर उचकटून २० हजारांची रोख लंपास

By PCB Author

July 22, 2019

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – किराणामालाचे दुकान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील २० हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.२०) रात्री अकरा ते रविवारी (दि.२१) सकाळी सहाच्या दरम्यान नेरेदत्तवाडी गावच्या हद्दीतील दत्तवाडी चौकात असलेल्या भवानी सुपर मार्केट या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानदार मोहन धनाराम चौधरी (वय ३४, रा. नेरेदत्तवाडी, दत्तवाडी चौक, सागर जाधव यांच्या खोलीत) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन चौधरी यांचे दत्तवाडी चौकात भवानी सुपर मार्केट नावाचे किराणामालाचे दुकान आहे. शनिवारी (दि.२०) रात्री अकरा ते रविवारी (दि.२१) सकाळी सहाच्या दरम्यान त्यांचे दुकान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील २० हजारांची रोख लंपास केली. पोलिस उपनिरीक्षक रमेश केंगार चोरट्याचा शोध घेत आहेत.