नेदरलॅंडसचा सलग दुसरा विजय, बाद फेरीत प्रवेश

0
321

अॅमस्टरडॅम, दि.१८(पीसीबी) : मेम्फीस डेपे आणि डेंझेल डुमपफ्राईज यांनी केलेल्या गोलच्या जोरावर नेदरलॅंडसने आपला युरो २०२० स्पर्धेतील बाद फेरीच्या प्रवेशाव शिक्कामोर्तब केले. सलग दुसरा विजय नोंदविताना त्यांनी ऑस्ट्रियाचा २-० असा पराभव केला.

सामन्याच्या ११व्या मिनिटालाच मिळालेली पेनल्टीची संधी डेपेने वाया जाऊ दिली नाही. युक्रेनविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या डुमफ्राईजने दुसऱ्या सत्रात गोल करत नेदरलॅंडसची आघाडी वाढवली आणि तीच आघाडी टिकवून ठेवत त्यांनी विजय मिळविला.

नेदरलॅंडस मायदेशात खेळताना नेहमीच सरस ठरतात. तरी ते २०१४ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या स्पर्धेत खेळत होते. आजच्या सामन्याचे विशेष म्हणजे नेदरलॅंडस संघाचे प्रशिक्षक प्रॅंक डी बोएर यांनी ज्यांच्याकडून जबाबदारी स्विकारली ते माजी प्रशिक्षक रोनाल्ड कोएमन हे सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.
युरो स्पर्धेत ऑस्ट्रियाविरुद्ध गोल केल्यावर सहकाऱ्यासह आनंद व्यक्त करताना डुमफायर्स (उजवीकडील)

दुसऱ्या विजयाने आता नेदरलॅंडसचे खेळाडू अखेरच्या सामन्यात नॉर्थ मॅसेडोनियाविरुद्ध बिनधास्त खेळू शकतील. आम्ही बाद फेरीत प्रवेश केला असला, तरी आम्हाला सुधारण्यासाठ अजून खूप वाव आहे. चेंडूवर नियंत्रण राखण्यावर आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे,असे नेदरलॅंडसचे प्रशिक्षक बोएर म्हणाले. ऑस्ट्रिया संघ आज मार्को अर्नाऊटोविचच्या गैरहजेरीत दुबळा पडला होता. नॉर्थ मॅसेडोनियाविरुद्धच्या सामन्यात त्याला बदलण्यात आल्यावर त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा अपमान केल्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे तो खेळू शकला नाही.

सामन्याच्या पहिल्या सत्रात नेदरलॅंडस संघाला गोल करण्याची संधी जणू आयती चालून आली. डुमफ्राईजला रोखण्याचा युक्रेनच्या खेळाडूंचा प्रयत्न फसला. त्याला धोकादायक पद्धतीने अडवता डेव्हिड अल्बाचा फाऊल झाला आणि डेपेने मिळालेली पेनल्टीची संधी अचूक साधली. त्यानंतर डुमफ्राईज याने पुन्हा एकदा आपल्या वेगवान खेळाने आपली योग्यता आणि उपयुक्तता दाखवून देत संघाचा दुसरा गोल केला.