निष्पापांवरील अत्याचाराने पिंपरी-चिंचवडचा बदलौकिक राज्यपातळीवर नेला; पोलिस आयुक्तालय काय चाटायचे आहे का?

0
901

पिंपरी, दि. ४ (रोहित साबळे)- पिंपरीचिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेदिसत आहे. टोळी युध्द, राजकीय वैमनस्यातून खून, हफ्तेखोरी, अवैध धंद्यातून मारहाण, चोरी, खंडणीसाठी अपहरण अशाअनेक भयानक घटना शहरात घडल्या आहेत. मात्र सध्या सलग एका आठवड्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्याघटनांनी औद्योगिकनगरीचा बदलौकिक राज्यपातळीवर नेला. या सर्व घटनांमुळे शहरातील नागरिक चिंतेत आहेत. मुलांनाशाळेत आणि घराबाहेर खेळायला पाठवायचे की नाही असा प्रश्न शहरवासीयांना सतावत आहे. शहरासाठी स्वतंत्र पोलिसआयुक्तालय सुरू झाले असले तरी, त्याचा गुन्हेगारांवर कोणताही प्रभाव पडलेला नाही. उलट पिंपरीचिंचवड शहराचेनावलौकिक बाल आणि महिलांवरील अत्याचारासाठी प्रसिध्द होऊ लागले आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारांवर जलद गतीने कारवाई होण्यासाठी नागरिकांनी पिंपरी-चिंचवडशहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची मागणी शासनाकडे केली होती. अनेक दिवसांनंतर १५ ऑगस्ट २०१८पासून पोलीस आयुक्तालय सुरु देखील झाले. मात्र त्याचा गुन्हेगारीवर आळा बसण्यात काही उपयोग होतोय असे दिसत नाही. कासारसाई, चिंचवड, निगडीत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला तर पिंपरीतील एका चिमुकलीचे अपहरण करुन तिची हत्याकरण्यात आली. या घटनांमुळे पिंपरीचिंचवड शहर परिसर हादरुन गेले असून पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याघटनेच्या निषेधार्थ अनेक मोर्चे, निषेध सभा, श्रध्दांजली सभा झाल्या. शहरात पहिल्यांदाच महिलांनी मोठ्या प्रमाणावररस्त्यावर उतरुन या घटनांचा निषेध केला.

मोठ्या आशेने नागरिक गुन्हेगारीवर आळा बसेल म्हणून पोलीस आयुक्तालयाकडे पाहत होते. मात्र पोलिसांनी नागरिकांच्यासुरक्षेच्या आशेचा भंग केला. आयुक्त देखील बोलघेवड्यासारखे आश्वासन देऊन मोकळे होतात, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. महिला आणि मुलींना पिंपरीचिंचवड शहरात असुरक्षितता जाणवू लागली आहे. सामान्य महिला तर सोडा महिला पोलिसदेखील शहरात सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर देखील कर्तव्यावर असताना हल्ले होतात. त्यांचा विनयभंग केला जातो. यामुळेपोलीसांचा वचकच राहिला नाही. तरी देखील आयुक्तालयाकडून नियोजनात्मक काम होताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर पीसीबीने शहरातील काही नागरिकांची मते जाणून घेतली. प्रत्येक नागरिकाचे एकच म्हणणे आहे कि, ज्या ज्यापरिसरात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्या त्या परिसरातील अवैध धंदे आधी बंद करायला हवे आहे. या अवैधधंद्यांमुळेच कुत्र्याच्या अंगाला गोचीड चिकटल्या सारखे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विकृत मनस्थितीचे लोक त्या ठिकाणी वावरतअसतात. यामुळे निष्पाप मुलींवर अत्याचाराचे प्रकार घडतात. अनेक गुन्हेगारी घटना एकमेकांशी सलग्न असतात. लॉटरी, जुगार, मटका यांसारखे धंदे होत असलेल्या ठिकाणी गुन्हेगार सतत घुटमळत असतात. त्यातून मद्यप्राशन, भांडणे, विकृतमनसिकता आणि महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैधधंदे बंद केले तर गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालता येणे शक्य होणार आहे. परंतु, पोलिसांनी सर्व प्रकारच्या अवैधधंद्यातून महिन्याकाठी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या हप्त्यांमुळे ते याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर गुन्हेगारीच्या घटनाघडतच राहतील, असे स्पष्ट मत नागरिकांनी व्यक्त केले आहेत.