निष्ठावंत शिवसैनिकांचा राजीनामा हाच आरक्षणावर जालिम उपाय – अशोक चव्हाण

0
958

सांगली, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला डिवचले. निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे द्यावेत, म्हणजे किमान सरकार पडण्याच्या भीतीने तरी आरक्षण मिळेल, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

सांगलीत पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत आता चर्चेच गुऱ्हाळ नको आहे. मागील मोर्चावेळीही अशी चर्चा झाली, मात्र प्रत्यक्षात काही झाल नाही. लोकांना आता चर्चा नको, निर्णय हवाय, असे असताना आंदोलकांवर पोलिसांकडून लाठ्या चालवल्या जात आहेत, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

यावेळी अशोक चव्हाण यांनी आरक्षणावरुन शिवसनेनेलाही डिवचले. ”मुख्यमंत्री आरक्षणाच्या बाबतीत अजून वेळकाढूपणाच करणार आहेत का? मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट केव्हा येईल, अधिवेशन केव्हा होईल यापेक्षा खऱ्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी जर पाठिंबा काढला, राजीनामे दिले तर क्षणभर सरकार राहणार नाही. सरकार राहणार नाही या भीतीने तरी आरक्षणाचा निर्णय होईल आणि हाच यावर जालिम उपाय आहे,” असे चव्हाण म्हणाले.