निवृत्ती फंडातील जास्त वाटा दिला नाही म्हणून मुलाने केला वडिलांचा खून

0
703

राचकोंडा, दि. १३ (पीसीबी) – वडिलांनी निवृत्ती फंडातील जास्त वाटा दिला नाही म्हणून मुलाने त्यांच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तेलंगणमधल्या राचकोंडा भागात घडली.

कृष्णा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर तरूण असे खून करणाऱ्या त्यांच्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हे पाणी पुरवठा विभागात काम करत होते. जून २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. ज्यानंतर त्यांना सहा लाख रुपये मिळाले. तसेच त्यांची एक जमीनही होती जी विकून त्यांना दहा लाख रुपये मिळाले. त्यातील दोन लाख रुपये त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि त्यानंतर त्यांनी इतर रक्कम मुलांमध्ये वाटली. तरूणने मात्र उरलेल्या रकमेसाठीही त्यांच्याकडे तगादा लावला होता. वडिलांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्यावर या दोघांमध्ये काही वेळा वादही झाला. अखेर वडील पैसे देत नाहीत म्हटल्यावर तरूणने त्यांना गाठले आणि त्यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तरूणसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. राचकोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.