निवृत्ती कधी घ्यायची हे मला चांगलचं कळतं

0
518

मुंबई, दि ४ (पीसीबी) – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत काही चांगली कामगिरी होत नसल्याने त्यांनी क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर करावी असा सुर चाहत्याकडून  निघत आहे. महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मला फलंदाजी आणि विकेटकिपिंग कशी करायची हे जितके कळत तितकच निवृत्ती कधी घ्याची हेही कळते, असे धोनी यांनी म्हंटले.

दरम्यान धोनीच्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील संथ गतीच्या फलंदाजीमुळे महेंद्रसिंग धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी, अशा प्रतिक्रिया चाहते आणि क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. या चर्चेला धोनीने पूर्णविराम दिला आहे. महेंद्रसिंग धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी असं म्हणणाऱ्या चाहत्यांना धोनीने प्रत्युत्तर दिले आहे. फलंदाजी कशी करायची, विकेटकिपिंग कशी करायची हे जितकं मला चांगलं कळतं, तितकंच मला निवृत्ती कधी घ्यायची हे ही कळतं, असे धोनीने म्हंटले आहे.