Maharashtra

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का ? मनसेचा सवाल

By PCB Author

July 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदारांची माहिती ‘आधार’ला जोडावी अशी विनंती केली आहे. याची गरज काय? यातील धोके काय ? याचा फायदा काय ? निवडणूक आयोगाने असे करावे का? निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदारांची माहिती “आधार”ला जोडावी अशी विनंती केली आहे . याची गरज काय? यातील धोके काय? याचा फायदा काय? निवडणूक आयोगाने असे करावे का? निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का? असा सवाल शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.

आधार कार्डची माहिती खासगी संस्थांकडे गेल्याची माहिती आपल्याला आहे. त्यामुळे आधार आणि मतदारयादी जोडली तर ती माहिती परदेशी व्यापारी संस्थांकडे जाईल का? त्यामुळे मतदारांच्या सखोल आणि विस्तृत माहितीचा गैरवापर होईल का? मतदारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न होईल का? असा प्रश्नही  शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून मतदारयादी आधार कार्डशी लिंक करावी, अशी मागणी केली आहे. यावर शिदोरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.