Desh

निवडणूक आयोगाचा दणका ; पंतप्रधान मोदींच्यावरील वेबसीरिज बंद करण्याचे आदेश

By PCB Author

April 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेबसीरिजचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. या भागांचे स्ट्रीमिंग थांबवण्यात यावे,  तसेच या सीरिजशी संबंधित सर्व प्रकारचा कंटेंट पुढील आदेशापर्यंत हटवण्यात यावा, असेही आयोगाने  स्पष्ट केले आहे.

इरॉस नाऊवर ‘मोदी- जर्नी ऑफ कॉमन मॅन’ ही मोदींच्या जीवनावरील वेबसीरिज सुरू  आहे. या सीरिजच्या सर्व भागांचे स्ट्रीमिंग तत्काळ थांबवण्यात यावेत,  असे   निवडणूक आयोगाने इरॉस नाऊला सुचना दिल्या आहेत.  दिले.

दरम्यान, ही वेबसीरिज निवडणूक काळात प्रदर्शित करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. या सीरिजवर आम्ही गेल्या ११ महिन्यांपासून काम करत आहोत. काही तांत्रिक समस्यांमुळे सीरिजचे प्रदर्शन लांबले, असा खुलासा  वेबसीरिजच्या दिग्दर्शकांनी केला आहे.  या  वेबसीरिजचे निर्माते  उमेश शुक्ला  आहेत.