निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका; ‘चौकीदार चोर है’ जाहिरात आणि व्हिडीओवर बंदी

0
596

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भाजपने लोकसभेच्या प्रचारासाठी  ‘मै भी चौकीदार’  गाणे तयार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने ‘चौकीदार चोर हे’ हे कॅम्पेनिंग  व्हिडोओ आणला.  पण आता  निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ‘चौकीदार चोर है’ या जाहिरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे.  त्यामुळे  ऐन रंगात आलेल्या प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या प्रचार अभियानाला मोठा धक्का बसला आहे.   

‘चौकीदार चोर है’ या जाहिरात आणि व्हिडीओवर बंदी आणण्याचे  आदेश  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  भाजपने निवडणूक आयोगाकडे या जाहिराती संदर्भात तक्रार केली होती. काँग्रेसची जाहीरात ‘चौकीदार चोर है’ वर बंदी घालावी, असे राज्य स्तरीय मीडिया प्रमाणन म्हणजेच अनुरीक्षण समितीने म्हटले आहे.

दरम्यान, या जाहिरातीविरोधात भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात  याचिका दाखल केली होती. या  याचिकेवरील  सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने  काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांच्याकडे खुलासा  मागितला आहे.  त्याचबरोबर राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी २२ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे.