निवडणूकांच्या आधीच हा प्रकार का सुरु झाला?; एम. जे. अकबर यांनी आरोप फेटाळले

0
353

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – माझ्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे असून राजकीय हेतूने जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणूकांच्या आधीच हा प्रकार का सुरु झाला? याच्यामागे काही अजेंडा आहे का? असा सवाल केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी उपस्थित करून आपल्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत.