Maharashtra

निवडणुक आयोगाकडून चिन्हांचे वाटप; वंचितला गॅस सिलेंडर तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीनचे चिन्ह

By PCB Author

August 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – विधानसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह दिले आहे. तसेच इतरही काही स्थानिक पक्षांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कप-बशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तसेच काही ठिकाणी त्यांना वेगळे चिन्ह मिळाले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तसेच संभाजी ब्रिगेड शिलाई मशीन या चिन्हाचा वापर करतील. त्याच बरोबर महाराष्ट्र क्रांती सेना -हिरा, हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टी – किटली आणि भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन या चिन्हांचा वापर करणार आहेत.