निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरात लावणार – सुजय विखे-पाटील

0
601

शिर्डी, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन जो गोंधळ झाला. त्यामुळे मला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली.  त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरात यांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे, असा टोला  भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या  संगमनेर मतदारसंघात  सुजय विखे- पाटील यांनी जाहीर  सभा  घेतली. यावेळी सुजय विखे-पाटलांनी  राष्ट्रवादी आणि बाळासाहेब थोरातांवर जोरदार हल्ला चढवला.  यावेळी काँग्रेसच्या ३०० कार्यकर्त्यांनी  महायुतीत प्रवेश केला.

विखे म्हणाले की, मी म्हणणार नाही विकास पहायला गुजरातला जा. दोन मतदारसंघ शेजारी आहेत माझ्या वडिलांचा आणि थोरातांचा. आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो. माझे वडील मंत्री झाले. याच सर्व श्रेय बाळासाहेब थोरात यांना जाते, असेही ते म्हणाले.