निवडणुका संपताच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ; पेट्रोल ९ तर डिझेल १६ पैशांनी महागले

0
325

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील चार महानगरे तसेच, अन्य शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरांत सोमवारी प्रतिलिटर अनुक्रमे ९ व १६ पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ७६.७३ रुपयांवर पोहोचला. तर, डिझेलच्या दराने ६९.२७ रुपये प्रतिलिटरचा स्तर गाठला.