Maharashtra

निवडणुकांमध्येच ‘तहलका’, काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर?

By PCB Author

April 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकांना सुरूवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील नाराजांचे आऊटगोईंग सुरूच आहे. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. ट्विटरवरूनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती.