निलेश राणे मरेल, त्याच वेळी नितेशची साथ सोडेल 

0
566

सिंधुदुर्ग,  दि.१४ (पीसीबी) – नितेश राणे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. निलेश राणे मरेल, त्याच वेळी नितेशची साथ सोडली जाईल, असा खुलासा माजी खासदार निलेश राणे यांनी नितेश राणे यांच्याशी सुरू असलेल्या मतभेदाच्या चर्चांवर केला आहे. एकविसाव्या शतकात नितेश राणेसारखा भाऊ सापडणे हे माझे भाग्य आहे . त्यांची साथ मी आयुष्यभर सोडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कणकवलीतील युतीचे उमेदवार नितेश राणेंनीही मवाळ भूमिका घेत शिवसेनेवर टीका करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.  तर त्याविरोधात निलेश राणे यांनी भूमिका घेत नितेशच्या भूमिकेशी मी जराही सहमत नाही, असे म्हटले होते. यावरून या दोघां बंधूमध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

यावर खुलासा करताना निलेश यांनी म्हटले आहे की, माझ्या ट्वीटचा अर्थ वेगळा घेतला गेला. पण शिवसेनेने आमचा तिरस्कर करायचा आणि आम्ही त्यांना काय ओवाळायचं? ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल, त्याच वेळी आम्ही शांत राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरुनच करणार, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.