Maharashtra

“निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही”

By PCB Author

May 23, 2020

मुंबई,दि.२३(पीसीबी) – निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपनेते निलेश राणे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार बोलत होते.

गेले काही दिवस निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे. ते वाकयुद्ध शमणार असं वाटत असतानाच आता निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही, असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे. भरलेलं भांडं आणि मोकळं भांडं यामध्ये मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येतो. धमकीला मी अजिबात घाबरत नाही. शेवटी फक्त खोकल्या धमकीला कोण घाबरतो??, अस रोहित पवार म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीतल्या बऱ्याचश्या नेत्यांनी मला सांगितलं की अश्या लोकांच्या नादी लागून उगीच वेळ जातो. त्यापेक्षा त्यांच्या नादी लागयचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.