Maharashtra

‘निर्लजम सदासुखी महापालिका अन् बेजबाबदार राज्यसरकार’

By PCB Author

July 16, 2019

मुंबई, दि, १६ (पीसीबी) –  मुंबईकरांना आज अजून एक धक्का बसला आहे. डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळल्याने या इमारतीखाली इमारतीतील ४० ते ५० रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी डोंगरी दुर्घटनेमध्ये सरकारला जबाबदार धरल आहे.

मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत. डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत धोकादायक असल्याची तक्रार वारंवार केली गेली मात्र भसम्या झाल्यागत भ्रष्टाचारी महानगरपालिकेला पैसे गिळण्याशिवाय वेळ मिळाला तर ते लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल ना! pic.twitter.com/B2M6xXgQSV

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2019

डोंगरी दुर्घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी धनंजय मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे.