नितेश राणेंवर खुनाचे कलम लावा, असे म्हटलेच नाही; चंद्रकांत पाटलांचा दावा

0
574

मुंबई, ८ (पीसीबी) – मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने रस्तावर चिखल उडत असल्या करणावरुन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली होती. या  प्रकरणानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिडित कुटुंबांची भेट घेतली. नारायण राणे यांनी खुद्द मला मुलाच्या बचावासाठी फोन केला होता. मात्र मी त्यांना नकार दिला. आणि नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केला असे कलम लावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले, असे त्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. मात्र आता पाटील यांनी मी अस म्हंटलोच नसल्याच सांगत पलटी मारली आहे.

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या चिखलफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयाची भेटी दरम्यानचा व्हीडीओ व्हायर होत आहे. यामध्ये मध्ये चंद्रकांत पाटील यांनी नितेश राणे यांच्या विरोधात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करा, असे म्हंटल्याच दिसत आहे. नारायण राणे यांनी खुद्द मला मुलाच्या बचावासाठी फोन केला होता. मात्र मी त्यांना नकार दिला. आणि नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केला असे कलम लावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले, असे पाटील म्हणाले.