Maharashtra

नितेश राणेंच्या अटकेविरोधात राष्ट्रवादी, मनसे करणार जेलभरो आंदोलन

By PCB Author

July 09, 2019

मुंबई, दि, ९ (पीसीबी) – मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने रस्तावर चिखल उडत असल्या करणावरुन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली होती. या प्रकरणानंतर आमदार नितेश राणेंनी अटक करण्यात आली. दरम्यान नितेश राणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज ठाकरे यांच्या मनसेने पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी आणि मनसे १६ जुलैला नितेश राणेंच्या अटकेविरोधात जेलभरो आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ९ जुलै पर्यंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज राणे यांना न्यालयात हजार करण्यात येणार आहे. दरम्यान नितेश राणे यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि मनसे राणे यांना पाठींबा दिला आहे. इतकेच नव्हे तर राणे यांच्या अटके विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे येत्या १६ जुलैला जेलभरो आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या या निर्णयानंतर सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.