Maharashtra

‘नितीन गडकरी असे व्यक्तिमत्व आहे’ ज्या कामाला हात लावतात ते सहज पूर्ण होते

By PCB Author

January 20, 2020

मुंबई, दि.२० (पीसीबी) – नागपूरच्या चिटणीस सेंटरमध्ये ‘एक पहल अभिनव गाव की ओर’ या कार्यक्रमात बोलताना जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर चांगलीच स्तुतिसुमने उधळली आहे. या कार्यक्रमात गडकरी आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत झाली, ज्यामध्ये बोलताना दोघांनीही आपल्या-आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले.

नाना पाटेकर म्हणाले, ‘नितीन गडकरी असे व्यक्तिमत्व आहे ते ज्या कामाला हात लावतात ते सहज पूर्ण होते’. राजकारण करत असताना गडकरी प्रेमाने दुसऱ्याचे कान टोचतात. मात्र, विरोधक सुद्धा त्यांचा विरोध करत नाही.