नितीन गडकरींनी घेतले मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन  

0
451

पणजी, दि. १८ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव निवासस्थानावरुन पणजीतील भाजपा मुख्यालयात नेण्यात आले आहे. यादरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा भाजप समर्थकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.

मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापावला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने  आजारी होते.

त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय  आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने  आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.