नितीन गडकरींना युतीच्या चर्चेपासून दूर का ठेवले ? तर्कवितर्कांना उधाण  

0
410

नागपूर, दि. २० (पीसीबी) – स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी आग्रही असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना युतीच्या चर्चेपासून अलिप्त का ठेवण्यात आले ? असा प्रश्न भाजप वर्तुळात उपस्थित केला जात आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा रंगू लागली आहे.   

भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष व विरोधी पक्षांशी चांगले संबंध असणारे नेते  अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्यामुळे राज्यातील युतीच्या महत्त्वपूर्ण घडामोडीपासून त्यांना दूर ठेवण्याचे कारण काय?  असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांसह विदर्भातील शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी युतीमध्ये ताणाताणी झाली की, भाजपकडून लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे शिष्टाई करत होते. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोल करणाऱ्या नेत्यांमध्ये नितीन गडकरींचाही समावेश होता. पहिल्या युतीच्या सत्तेच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही गडकरी यांच्यावर  विशेष मर्जी होती.