नितीन गडकरींना चितपट करण्याची आशिष देशमुखांची तयारी

0
460

नागपूर, दि. ६ (पीसीबी) – लोकसभेसाठी संधी मिळाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे भाजपला सोडचिठ्ठी दिलेले आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. नागपूरची जागा गडकरींसाठी अनुकूल नाही, त्यामुळे या ठिकाणी आपलाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आज (शनिवार) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत  बोलताना ते म्हणाले की, आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून भाजपने ती जिंकून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले आहे. २ ऑक्टोबरला आपण आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. तरीही तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.

दरम्यान, ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आपला राजीनामा मंजूर करुन काटोलमध्ये विधानसभा पोटनिवडणूक घ्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे.