Maharashtra

निझमुद्दीनल जे गेले होते त्यांनी जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी – राजेश टोपे

By PCB Author

April 06, 2020

मुंबई, दि.6(पीसीबी) – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत नुकतीच महत्वाची बैठक झाली. मलबार हिल येथील जेतवन या आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली.

निझमुद्दीनल जे कोणी गेले होते त्यांनी जवळच्या रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करून प्रशासनाला मदत करावी. राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

दरम्यान, देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून यावर मार्ग काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.