Pimpri

निगडी वाहतुक पोलिसांचा अजब कारभार; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्ताच्या कारला आकारला ट्रिपल सिटचा दंड

By PCB Author

January 15, 2019

निगडी, दि. १५ (पीसीबी) – निगडी वाहतुक पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कारला चक्क ट्रिपल सिटचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची (एमएच/१४/सीएल/१५९९) ही कार निगडी येथील सुरज स्वीट समोर उभा करण्यात आली होती. यावेळी निगडी वाहतूक पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी पोलिसांकडून गल्लत झाली. महापालिका आयुक्तांच्या कारचा नंबर (एमएच/१४/सीएल/१५९९) हा आहे. मात्र वाहतुक पोलिसांनी दंड आकारताना “सीएल” च्या जागी “डीएल” असे मशीनमध्ये फिड केले, जो एका दुचाकीचा नंबर आहे. त्यामुळे चलन मशीनमधून २०० रुपयांचा दंड आयुक्तांच्या गाडीला आकारण्यात आला. जो एक ट्रिपलसिटचा दंड आहे.  हा सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीसांनी दिली आहे. तसेच चूक दुरुस्त करून घेतली जाईल असे सांगण्यात  आले आहे.