निगडी येथे नर्सचा विनयभंग; एकावर गुन्हा

0
1048

निगडी, दि. ६ (पीसीबी) – एका नर्सचा पाठलाग करुन अश्लील हावभाव करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.५) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथील एका खाजगी रुग्णालयाच्या दरवाजाजवळ घडली.

याप्रकरणी पिडित २२ वर्षीय नर्सने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित सदाशिव शिवेकर (रा. निगडे, ता. मावळ) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २२ वर्षीय नर्स हि निगडीतील एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. बुधवारी दुपारी रुग्णालयात कामाला जात असताना आरोपी अमित शिवेकर याने नर्सचा पाठलाग करुन त्यांना अश्लील हावभाव करत विनयभंग केले. याप्रकरणी पिडित नर्सने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्ष बनसोडे तपास करत आहेत.