निगडीमध्ये भांडणात सहभागी असल्याच्या संशयातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
516

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – भांडणात सहभागी असल्याच्या संशयातून तीन जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाचा पाठलाग करुन त्याला सिमेंटचा गट्टू आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना निगडीतील संजय हॉटेल चौकाजवळ सेक्टर २२ येथे घडली.

मयुर दादा गायकवाड (वय १९, रा. राजनगर सेक्टर नं.२२, घर क्र. बी५/०२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दादा गवळी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१६) रात्री साडेनऊच्या सुमारास मयुर याला त्याचा मित्र दिपक भिसे याने रिक्षाचा टायर बदलण्यासाठी बोलून घेतले. यावेळी निगडीतील संजय हॉटेल चौकाजवळ सेक्टर २२ येथे उभे असलेले आरोपी दादा गवळी आणि त्याच्यासोबतच्या दोन साथीदारांनी मयुरकडे बोट दाखवून इशारा केला. यावर मयुर तेथून निघुन जाण्याचा प्रयत्न करत होता. इतक्या दादा आणि त्याच्या दोघा साथीदारांनी त्याचा पाठलाग करुन गाठले. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन जखमी करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत मयुर जखमी झाला आहे. आरोपी दादा आणि त्याच्या दोन साथीदार अद्याप फरार आहेत. निगडी पोलीस तपास करत आहेत.