निगडी प्रभागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

0
181

 – राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल उबाळे यांची आयुक्तांकडे मागणी

निगडी दि.१७ (पीसीबी) – निगडी भागातील वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन संपुर्ण निगडी प्रभागात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल उबाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

विशाल उबाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी गावठाण, सेक्टर २२, यमुनानगर सेक्टर २१, निगडी वसाहत, पि.सी.एम.सी कॉलनी, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्री कृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर इत्यादी परिसरामध्ये दाट लोकवस्ती असुन गेल्या काही वर्षात या परिसरात हाणामारी होणे, गाड्यांची जाळपोळ होणे, सोनसाखळी चोरी जाणे, दरोडा, महिलावर्गाला व मुली यांना त्रास देणे तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे असे अनेक छोटे-मोठे गुन्हे या परिसरात सर्रासपणे होत असुन अशा वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी तसेच या वाढत्या गुन्हेगारीच्या होणाऱ्या त्रासापासुन नागरिकांना मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण निगडी प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व सदरच्या सीसीटीव्ही कॅमेरेची जोडणी स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तालयामध्ये करावी जेणेकरून जलद गतीने पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल तसेच या संवेदनशील ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास पोलिस प्रशासनाला मदतही होईल तसेच प्रभाग सुरक्षित राहण्यास नक्कीच मोलाची मदत होईल याकरिता प्रभाग क्रमांक १३ मधील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसविण्यात यावे” अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.